मस्क यांचे वडील येणार अयोध्येत   

नवी दिल्ली : टेल्सा आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौर्‍यावर येणार आहेत. १ ते ६ जून दरम्यान ते भारतात असणार आहेत. यादरम्यान ते अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत.या दौर्‍यावेळी ते व्यावसायाशी संबंधित धोरणकर्ते, गुंतवणूकदार, मंत्रालयाती पदाधिकारी यांच्यासोबत बैठकांना हजेरी लावणार आहेत. भारतात हरित तंत्रज्ञान आणि चार्जिंग पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या कामांना ते प्रोत्साहन देणार आहेत. काही दिवसापूर्वीच भारतीय कंपनी सर्वोटेकच्या जागतिक सल्लागार मंडळात त्यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली होती. ५ जून रोजी सर्वोटेक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते ६ जून रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. 

Related Articles